Ticker

6/recent/ticker-posts

Beed FDA Raid: प्रसादाच्या पेढ्यात भेसळ? बीडमधील नावजलेल्या डेअरीवर एफडीएचा छापा, लाखोंचा माल जप्त! काय काय सापडलं?


Beed FDA Raid : अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धुरा आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे आल्यानंतर एफडीए अॅक्शनमोडवर आले आहे. बीड जिल्ह्यात एक मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे.

बीड: अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धुरा आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे आल्यानंतर एफडीए अॅक्शनमोडवर आले आहे. बीड जिल्ह्यात एक मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे. केज तालुक्यातील उमरी फाटा येथील प्रसिद्ध ‘विशाल डेअरी’वर एफडीएच्या पथकाने रात्रीच्या सुमारास अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत तब्बल ६ लाख ६८ हजार रुपयांचा भेसळयुक्त, आरोग्याला घातक आणि असुरक्षित मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात दूध आणि मिठाई व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल डेअरीमध्ये अन्न सुरक्षा कायद्याचे सरळ-सरळ उल्लंघन होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. पथकाने रात्री छापा टाकला असता, डेअरीच्या आत प्रचंड अस्वच्छता आणि कीटकांचा प्रादुर्भाव असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. याशिवाय खरेदी-विक्रीच्या बिलांमध्येही गंभीर त्रुटी आढळून आल्या. या सर्व गंभीर बाबींची दखल घेत प्रशासनाने या डेअरीचा परवाना तातडीने निलंबित केला आहे.

Post a Comment

0 Comments